जसवंत गडावर डिजिटली आठवणींचा साठा; १९६२ च्या युद्धातील दृश्य

१९६२ च्या युद्धात चिनी सैनिकांनी सडेतोड उत्तर देणारे रयफलमान जसवंत सिंह यांच्या बलिदानाची साक्ष देणारे स्थळ म्हणजेच जसवंत गड.
1962 war between China and India Rifleman Jaswant Singh place to witness the sacrifice Digitally store Memories of Jaswant Fort arunachal pradesh
1962 war between China and India Rifleman Jaswant Singh place to witness the sacrifice Digitally store Memories of Jaswant Fort arunachal pradesh sakal

अरुणाचल प्रदेश : चीन आणि भारत दरम्यानच्या १९६२ च्या युद्धात चिनी सैनिकांनी सडेतोड उत्तर देणारे रयफलमान जसवंत सिंह यांच्या बलिदानाची साक्ष देणारे स्थळ म्हणजेच जसवंत गड. या गडाला भेट देणाऱ्या प्रत्येकाची डिजिटल आठवणी लष्कराच्या वतीने जपल्या जात आहेत. जसवंत गड येथे आता भेट देणाऱ्या प्रत्येकाची डिजिटल स्वरूपात नोंदी केल्या जात आहेत. नाव, स्वाक्षरी, जसवंत गडावरील अनुभव आणि डिजिटल फोटो असे या नोंदीचे स्वरूप असून आता पर्यंत हजारोच्या संख्येने डिजिटल आठवणींच्या जतन करण्यात आल्या आहेत.

पहिली न्याहारी जसवंत बाबाला....

जसवंत गडावरील स्मारकात हुतात्मा जसवंत सिंह यांच्या स्मरणार्थ एक पुतळा उभारण्यात आला असून याच स्मारकात एका विशिष्ट कपाटात जसवंत सिंह यांचे छायाचित्र तसेच, त्यांचे गणवेश व इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. आज ही सर्वात पहिले त्यांच्या पुतळ्यास सर्वात प्रथम न्याहारी दाखवली जाते, आणि मग इतर जवान अपल जेवण करतात. जसवंत बाबा यांना पहिला मान देण्याची ही परंपरा लष्कराने कायम ठेवली आहे.

१९६२ चे ते वृक्ष...

सिंह यांनी एकट्याने सुमारे ३०० चीनी सैनिकांचा खातमा केला होता. चीनी सैनिकांशी लढताना जेव्हा सिंह यांना गोळ्यांनी भेदण्यात आले तेव्हा ही ते शत्रूला लढा देत राहिले. मात्र लढताना त्यांना ज्या वृक्षाजवळ मरण पावले ते वृक्ष आज ही त्यांच्या शौऱ्याची साक्ष देत आहे. या वृक्षाचे जतन करण्याच्या अनुषंगाने लष्कराच्या वतीने येथे स्मृती स्थळ तयार करण्यात आले आहे. या स्मृती स्थळात त्यांच्या काही वस्तू ठेवण्यात आल्या असून या वृक्षाचे संवर्धन करण्यात आले आहे.

"डिजिटल स्वरूपात नोंदी केल्यामुळे आता आमच्या आठवणी येथे कायमस्वरूपी असतील याचा आनंद होत आहे. या स्मारकाला भेट दिल्यानंतर आपल्या सैन्याचा अभिमान वाटत आहे."

- अशोक पगारे, (मुंबई) पर्यटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com