1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद लंबूला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एकूण 106 जणांवर आरोप सिद्ध झाले असून, यातील 38 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्ली : 1993 मध्ये झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद मोहम्मद लंबूला आज (शुक्रवार) अटक करण्यात आली. अहमद मोहम्मद लंबूच्या अटकेची कारवाई गुजरात एटीएसने केली. एटीएसने लंबूला धारिया येथून अटक केली.

1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एकूण 106 जणांवर आरोप सिद्ध झाले असून, यातील 38 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या यादीत मोहम्मद लंबूच्या नावाचा समावेश झाला आहे.

1993 Mumbai Serial Blasts Accused Ahmed Mohammed Lambu Arrested by Gujrat ATS

दरम्यान, यापूर्वी एप्रिल महिन्यात ताहिर मर्चंट उर्फ ताहिर टकला याला न्यायालायने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, कारागृह प्रशासनाकडून शिक्षा देण्यापूर्वीच त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

Web Title: 1993 Mumbai Serial Blasts Accused Ahmed Mohammed Lambu Arrested by Gujrat ATS