Video : हुतात्मा जवानांच्या श्रद्धांजली सभेतच राडा; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

वृत्तसंस्था
Saturday, 27 June 2020

विविध राज्यात कार्यक्रम

देशातील विविध राज्यांत आणि जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

अजमेर : गलवान घाटीमध्ये चीनी सैनिक आणि भारतीय लष्करातील जवानांमध्ये संघर्ष झाला होता. यामध्ये भारतीय जवानांनी चीनच्या 40 सैनिकांचा खात्मा केला. परंतु यामध्ये 20 जवान हुतात्मा झाले. या सर्व जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी 'शहिदों को सलाम' हा कार्यक्रम काँग्रेसकडून पाळण्यात आला. मात्र, त्याचदरम्यान काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गलवान घाटी संघर्ष प्रकरणानंतर केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. तसेच देशात सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती या सर्व बाबींमुळे टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून 'शहिदों को सलाम' दिवस पाळण्यात आला. त्यामध्ये देशभरात काँग्रेसने हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मोदी सरकारवर टीका करताना कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजस्थानमध्ये या श्रद्धांजली कार्यक्रमाला गालबोट लागले.

अजमेर येथे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरु होता. मात्र, त्याचवेळी दोन काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या या दोन्ही कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. हे चित्र पाहिल्या मिळाल्यानंतर उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी ही भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यत या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

विविध राज्यात कार्यक्रम

देशातील विविध राज्यांत आणि जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, राजस्थानमध्ये याच कार्यक्रमाला गालबोट लागले. जेव्हा या दोन कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 

भारताची बलवान घाटी 

गलवान घाटीमध्ये चीनी सैन्याशी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. मात्र, भारतीय शूर सैनिकांनी चीनच्या 40 सैनिकांना ठार करुन चीनला धडा शिकवला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने आपले बळ दाखविलेली गलवान घाटी ही भारताची बलवान घाटी ठरली आहे. आम्हाला या गलवान घाटीचा अभिमान आहे, असे रामदार आठवले यांनी यापूर्वी म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 Congress party workers clash at a condolence meeting in Ajmer Rajasthan