‘पर्यटन क्षेत्रातील २.१५ कोटी लोक बेरोजगार’ जी. किशन रेड्डी

कोरोनाचा पर्यटनावर नेमका काय परिणाम झाला? याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला असून पहिल्या लाटेदरम्यान एक कोटी ४५ लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला
2 crore unemployed in tourism sector Kishan Reddy new delhi
2 crore unemployed in tourism sector Kishan Reddy new delhi sakal

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या तीन लाटांचा पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला असून या क्षेत्राशी संबंधित २ कोटी १५ लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या ९३ टक्क्यांनी घटली, दुसऱ्या लाटेदरम्यान हेच प्रमाण ७९ टक्के एवढे होते तर तिसऱ्या लाटेत ते ६४ टक्के होते, असे रेड्डी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना म्हणाले.

कोरोनाचा पर्यटनावर नेमका काय परिणाम झाला? याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला असून पहिल्या लाटेदरम्यान एक कोटी ४५ लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला तर दुसऱ्या लाटेत तेच प्रमाण ५२ लाख आणि तिसऱ्या लाटेत ते अठरा लाख एवढे होते. कोरोनाच्या संसर्गाची लाट येण्यापूर्वी तीन कोटी ८० लाखांपेक्षाही अधिक लोक या क्षेत्राशी संबंधित होते. कोरोनाच्या तीन लाटांदरम्यान पर्यटन क्षेत्राची अर्थव्यवस्था घसरली. भारतातच नाही तर जगभरातील पर्यटन व्यवसायाला याचा जबर फटका बसल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.

बिनव्याजी कर्जाचा आधार

आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लशींचे १८० कोटींपेक्षाही अधिक डोस देण्यात आले असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहेत, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. प्रवास आणि पर्यटनक्षेत्रातील भागधारकांना दहा लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात आले असून पर्यटक मार्गदर्शकांना (टुरिस्ट गाईड) एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात आले आहे. राज्यांनी देखील त्यांना ज्या मार्गाने शक्य आहे त्याद्वारे पर्यटन क्षेत्राला मदत करावी, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com