बेळगावजवळ बस पलटी होऊन दोन ठार, सोळा जखमी

अमृत वेताळ
शनिवार, 14 जुलै 2018

अशोक दुडी (रा. कित्तुर) असे ठार झालेल्या केएसआरटीसीच्या बस चालकाचे नाव आहे. तर आणखी एका मयताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातात एकूण 16 प्रवासी जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे.

बेळगाव : बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस उलटीन दोघे जण जागीच ठार झाले तर 16 जण जखमी झाले. यापैकी चौघे गंभीर जखमी आहेत. आज ( ता. 14) पहाटे 6.30 च्या सुमारास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठ नजीक घडला. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

अशोक दुडी (रा. कित्तुर) असे ठार झालेल्या केएसआरटीसीच्या बस चालकाचे नाव आहे. तर आणखी एका मयताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातात एकूण 16 प्रवासी जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे 6.30 च्या सुमारास उडपी डेपोची बस बेळगावहून होन्नाहोसुरला जात होती.

महामार्गावरील बडेकोळमठ नजीक बसवरील ताबा सुटल्याने भरधाव बस दुभाजकाला धडकून उलटल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सर्व जखमीना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: 2 dead in accident near Belgaum