...अन् विमानातील प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला !

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

कोईंबतूर ते हैदराबाद आणि बंगळुरु ते कोचिनला जाणाऱ्या इंडिगो विमानाबाबत ही घटना घडली. ही दोन्ही विमाने अगदी जवळच्या अंतरावर असताना टीसीएएसने याबाबत वैमानिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. त्यानुसार वैमानिकांनी सतर्कता दाखवत विमानाचे लँडिंग केले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

बंगळुरु : इंडिगोची दोन विमाने समोरासमोर आल्याने वैमानिकाच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. बंगळुरु एअरस्पेसजवळ इंडिगोचे दोन विमाने समोरासमोर आली होती. मात्र, काही सेकंदाच्या फरकाने मोठी दुर्घटना टळली. इंडिगो विमानातील सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

याबाबत इंडिगो विमानाच्या वैमानिकांनी सांगितले, की इंडिगोची दोन विमाने हवेमध्ये होती. त्यादरम्यान ही दोन्ही विमान एकमेकांच्या जवळ येत असल्याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेने (टीसीएएस) दोन्ही वैमानिकांना दिली. या माहितीवरून दोन्ही वैमानिक सतर्क झाले. याबाबत इंडिगोने सांगितले, की टीसीएएस 'रिजॉल्यूशन अॅडवायजरी सिस्टिम' वर हे विमान जवळ आल्याचे दिसले. त्यानंतर वैमानिकांना सतर्क करण्यात आले.  

कोईंबतूर ते हैदराबाद आणि बंगळुरु ते कोचिनला जाणाऱ्या इंडिगो विमानाबाबत ही घटना घडली. ही दोन्ही विमाने अगदी जवळच्या अंतरावर असताना टीसीएएसने याबाबत वैमानिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. त्यानुसार वैमानिकांनी सतर्कता दाखवत विमानाचे लँडिंग केले आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

Web Title: 2 Indigo planes narrowly escape mid air collision over Bengaluru airspace after coming face to face