गुरेझ सेक्टरमध्ये बीएसएफच्या कॅम्पवर हिमस्खलन

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

बंदिपुरा जिल्ह्यातही एका घरावर हिमस्खलन झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मारमधील गुरेझ सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॅम्पवर आज (गुरुवार) सकाळी झालेल्या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांना शोध घेण्यात येत आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरेझ सेक्टरमध्ये असलेल्या बीएसएफच्या कॅम्पवर आज सकाळी हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात दोन जवान बेपत्ता झाले आहेत. गंदेरबल जिल्ह्यात बुधवारी लष्कराच्या कॅम्पवर हिमस्खलन झाले होते. यामध्ये दोन अधिकाऱ्यांसह चार जवान हुतात्मा झाले होते.

बंदिपुरा जिल्ह्यातही एका घरावर हिमस्खलन झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे.

Web Title: 2 Jawans Missing After Avalanche Hits Army Camp In Kashmir's Gurez Sector