उमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

उमर खालिदवर 13 ऑगस्टला गोळीबार झाला होता. त्यातून तो बचावला होता. पोलिस या दोघांनी अपलोड केलेल्या व्हिडिओची आयपी ऍड्रेसवरून सत्यता पडताळत आहेत. शिख क्रांती झालेल्या गावातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण विशेष पथकाकडे दिले होते. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर पिस्तुल तेथेच फेकून दिले होते.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, उमरवर गोळीबार केल्याचे या दोन्ही हल्लेखोरांनी कबूल केले आहे. दर्वेश शाहपूर आणि नवीन दलाल अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी 15 ऑगस्टला फेसबुकवर व्हिडिओ टाकला होता, यामध्ये त्यांनी आम्ही भारताला स्वातंत्र्यदिनाची भेट देत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांना 17 ऑगस्टला ताब्यात घेण्यात आले आहे. 

उमर खालिदवर 13 ऑगस्टला गोळीबार झाला होता. त्यातून तो बचावला होता. पोलिस या दोघांनी अपलोड केलेल्या व्हिडिओची आयपी ऍड्रेसवरून सत्यता पडताळत आहेत. शिख क्रांती झालेल्या गावातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण विशेष पथकाकडे दिले होते. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर पिस्तुल तेथेच फेकून दिले होते.

Web Title: 2 men detained for attack on Umar Khalid says Delhi Police