धक्कादायक! दिशाच नाही, तर आणखी 9 जणींना जाळलं होतं त्या नराधमांनी...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

हैदराबाद पोलिसांनी मोहम्मद आरिफ, जे. नवीन, जे. शिवा आणि चेनाकेशवुलू या चौघांना अटक केली होती. त्यानंतर केलेल्या चौकशीत या चौघांनी दिशापूर्वी 9 महिलांवर अशाच प्रकारे अमानुष अत्याचार करून जाळून मारले होते, असे खुद्द पोलिसांनीच चौकशीच्या तपशीलात सांगितले.

हैदराबाद : दिल्लीतल्या निर्भयानंतर हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टर तरूणीवर अमानुष बलात्कार करून तिला जाळण्यात आले होते. या घटनेचा देशभरातून निषेध झाला होता. त्यानंतर आठच दिवसात पोलिस आरोपींना घेऊन चौकशीसाठी घटनास्थळी गेलेले असता, त्यांनी पळून जायचा प्रयत्न केल्याने त्यांचा एन्कांऊंटर करण्यात आला. पण त्यांच्या चौकशीत एक धक्कादायक बाब उघड झाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या चार आरोपींबाबत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

Breaking : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा त्याचजागी एन्काऊंटर

Image result for hyderabad rape case

हैदराबाद पोलिसांनी मोहम्मद आरिफ, जे. नवीन, जे. शिवा आणि चेनाकेशवुलू या चौघांना अटक केली होती. त्यानंतर केलेल्या चौकशीत या चौघांनी दिशापूर्वी 9 महिलांवर अशाच प्रकारे अमानुष अत्याचार करून जाळून मारले होते, असे खुद्द पोलिसांनीच चौकशीच्या तपशीलात सांगितले. दिशाला अमानुषपणे मारल्यानंतर पोलिसांनी लगेचच या चौघांना पकडले होते व त्यांची कसून चौकशी केली होती. या चौकशीत या चार नराधमांनी यापूर्वी हैदराबादमध्ये अशाच प्रकारे 9 महिलांना मारल्याचे कबूल केले होते. 

हैदराबाद एन्काऊंटर करणारा हाच तो अधिकारी

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 'दिशाच्या घटनेनंतर आम्ही त्याच परिसरात घडलेल्या 15 बलात्कारांच्या घटनांची चौकशी केली. यात आरिफ व चेनाकेशवुलू यांनी नऊ बलात्कार व हत्या केल्याचे कबूल केले. संगारेड्डी, रंगारेड्डी, मेहबूबनगर व कर्नाटकच्या सीमाभागात त्यांनी हे गुन्हे केले होते. या नऊ हत्यांमध्ये काही वेश्या व तृतीयपंथीयांचा समावेश होता.' असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Image result for hyderabad rape case

हैदराबाद प्रकरण : तिचं शरीर पूर्ण जळालंय का? हे पाहण्यासाठी 'ते' पुन्हा आले!

27 नोव्हेंबरला या चौघांनी दिशावर बलात्कार करून तिला जाळून हत्या केली होती. त्यानंतर 2 दिवसांनी ही घटना उघडकीस आली, पोलिसांनी लगेच आरोपींना पकडले. यानंतर त्यांनी सखोल चौकशी केली, यात या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 suspects in hyderabad rape case are behind 9 more rape murders