जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

मोहम्मद इद्रीस सुलतान आणि आमिर हुसैन अशी या खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी होते अशीही माहिती आहे. या दोघांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

मोहम्मद इद्रीस सुलतान आणि आमिर हुसैन अशी या खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी होते अशीही माहिती आहे. या दोघांचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

यापूर्वी, शनिवारीदेखील शोपियाँ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या परिसरात जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम राबवली होती. यादरम्यान, हिज्बुल मुजाहिदीनचे इरफान अहमद भट व शाहिद अहमद मीर हे दहशतवादी ठार झाले होते. खुदपोरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यामुळे सुरक्षा दलांनी या भागात शनिवारी संध्याकाळी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले व आणखी दोन जण तेथून पळून गेले. भट हा गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांत सामील होता.

दरम्यान, काश्मीरमध्ये हिवाळ्याच्या आधी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न होतात. हिवाळा सुरू झाला की, हिमवृष्टीमुळे घुसखोरीचे मार्ग नोव्हेंबर ते मे या काळात बंद होतात. घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांच्या घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दले सज्ज असतात पण हिवाळ्यात तर त्याबाबत अधिक काळजी घेतली जाते.

Web Title: 2 Terrorists Killed In Shopian Encounter Today