काश्मीर: त्रालमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

army
army

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील त्राल येथे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, परिसरात शोधमोहिम सुरु आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील मीर मोहल्ला भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, जम्मू काश्मीर पोलिसांनी विशेष अभियान राबविले. सोमवारी रात्री दहशतवादी लपलेल्या घराला घेरण्यात आले. तेव्हापासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. अखेर आज सकाळी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.

सुरक्षा रक्षकांनी दहशतवादी लपलेले घर स्फोटाच्या माध्यमातून उडवून दिले. दहशतवाद्यांकडून स्वयंचलित बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. काही दहशतवादी पळून गेल्याची शक्यता असून, परिसरात शोधमोहिम राबविण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com