शिमलाजवळ बस दरीत कोसळून 20 जण ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात हा अपघात झाला असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

शिमला - हिमाचल प्रदेशातील शिमलाजवळ रामपुर येथे आज (गुरुवार) पहाटे प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 20 जण ठार झाले असून, अनेकजण जखमी आहेत.

हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात हा अपघात झाला असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासी बस ही खाजगी कंपनीची असून, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच रामपुरचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य करण्यात आले. बस किन्नौरहून सोलनकडे जात होती. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यात येणार असल्याचे सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: 20 killed as bus rolls down gorge in Himachal Pradesh