काश्मीर खोऱ्यात 20 दहशतवाद्यांची घुसखोरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणारे दहशतवादी कुख्यात दहशतवादी संघटना मसूद अजहरच्या 'जैश-ए-मोहम्मद'चे असल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू : दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषा पार करत मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली असून, ही घुसखोरी काश्मीर खोऱ्यात झाली आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीमधून सुमारे 20 दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणारे दहशतवादी कुख्यात दहशतवादी संघटना मसूद अजहरच्या 'जैश-ए-मोहम्मद'चे असल्याची माहिती मिळत आहे. या दहशतवाद्यांकडून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यात येणार असल्याची शक्यता असून, विशेषकरून काश्मीर खोऱ्याला लक्ष केले जाणार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील संवेदनशील भागांमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यास सांगण्यात आले आहे.

jaish e mohammed terrorist

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात 20 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: 20 terrorists infiltrated in Kashmir valley