RBI कडून दोन हजारांच्या नोटा रद्द; बाजारपेठेत महागड्या वस्तू खरेदी करुन नोटा खपवण्याकडं कल

गेल्या आठवड्यात आरबीआयकडून (RBI) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात रद्द करण्याची घोषणा केली आहे.
2000 Rupees Note
2000 Rupees NoteSakal
Summary

दोन हजार रुपयांची नोट बदलून देण्यासाठी २३ मेपासून सुरुवात झाली असून, ३० सप्टेंबर २०२३ अंतिम तारीख आहे.

बेळगाव : दोन हजार रुपयांच्या (Two Thousand Rupees) नोटा मागे घेण्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank) केल्यावर या नोटा खपविण्यासाठी बाजारपेठेत खरेदीचा कल वाढला आहे. प्रामुख्याने महागड्या व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश यात अधिक आहे.

गेल्या आठवड्यात आरबीआयकडून (RBI) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे या नोटा आहेत. त्यांनी २३ मेपासून बॅंकेमध्ये जमा करण्यास सूचविले आहे. मात्र, तेथे नोटा स्वीकारण्यासाठी घातलेली मर्यादा, याशिवाय नोंदी, दाखल्यांची पडताळणी आणि ओळखपत्रांचीही विचारणा सुरु आहे. यामुळे खूप लोक साहित्य खरेदी करून नोटा खपविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

2000 Rupees Note
Parbhani : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं 'मविआ'समोर थेट आव्हान; वादाची 'ती' ठिणगी वणवा पेटवणार?

बाजारपेठेत खासकरून इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, दागिने, सजावटीच्या वस्तू किंवा फर्निचर खरेदीसाठी कल वाढला आहे. ग्राहकांचा ऑनलाईन कल वाढला आहे. मात्र, दोन हजाराच्या नोटांसाठी नवीन नियमावली घोषित करण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या वस्तू खरेदीसाठी त्याचा वापर वाढविला आहे. परंतु, ग्राहकांचा नोटा खपविण्यासाठी खटाटोप व्यापाऱ्यांसाठी नवा त्रास सुरु आहे. किरकोळ किंवा छोट्या मोठ्या खरेदीसाठी अलीकडे या स्वरुपाच्या नोटा पुढे केल्या जात आहेत. यामुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांसाठी मनस्ताप वाढला आहे.

2000 Rupees Note
Balasaheb Patil : पडळकर, दरेकर, खोतांची लोकप्रियतेसाठीच शरद पवारांवर टीका; आमदार पाटलांचा घणाघात

कारण काय?

बॅंकांतर्फे दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारणाची तयारी दाखविली आहे. मात्र, त्याला नियमांची जोड दिली आहे. एकावेळी २० हजार रुपयांची मर्यादा घातली. दुसरीकडे या स्वरूपाच्या नोटा जमा करण्यात आल्यावर चौकशीचा ससेमिरा तर मागे लागणार नाही, याची भीती आहे. तसेच, बॅंकेकडून नोटा स्वीकारण्यास नकार, कालावधीत कमी केल्यास समस्या निर्माण होईल, या भीतीपोटी आतापासून या स्वरूपाच्या नोटा घेऊन लोक खरेदीचा बेत आखत आहेत.

2000 Rupees Note
Karnataka : मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? 50 आमदार दिल्लीत तळ ठोकून, हेब्‍बाळकरांसह 18 जण शर्यतीत

30 सप्टेंबरपर्यंत मुदत

दोन हजार रुपयांची नोट बदलून देण्यासाठी २३ मेपासून सुरुवात झाली असून, ३० सप्टेंबर २०२३ अंतिम तारीख आहे. बचत खाते असलेल्या ठिकाणी किंवा बचत खाते नसले तरी कोणत्याही बँकेतून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com