मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी सात जणांना जन्मठेप

 मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी सात जणांना जन्मठेप

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश)- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे 2013मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात आरोपींना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्‍बाल अशी त्यांची नावे आहेत. कवाल या गावात ही दंगल झाली होती. 

ऑगस्ट 2013 मध्ये कवाल या गावात गौरव आणि सचिन या दोघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हिमांशू भटनागर यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील अंजुम खान यांनी सांगितले, की बुलंदशहर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व दोषींना न्यायालयात नेता आले नाही आणि शेवटी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. काल सर्व आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. 

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यांत दोन समुदायात दंगल झाली होती. यात एकूण 62 जणांचा बळी गेला होता, तर 93 जण जखमी झाले होते. या दंगलीची सुरवात कवाल गावातून झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com