2019 मध्ये जीएसटीचा दर एकच असेल : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

आज मोदीजी आणि भाजप हेच सर्वकाही झाले आहे. केंद्रात आणि गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यांच्याकडे खूप शक्ती आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण काँग्रेसकडे सत्य असल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल.

नवी दिल्ली : सध्या मोदीजी आणि भाजप हेच सर्वकाही झाले आहे. केंद्रात आणि गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यांच्याकडे खूप शक्ती आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण काँग्रेसकडे सत्य असल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल. 2019 मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जीएसटीचा कमाल दर 18 टक्के करू असे आश्वासन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) दिले.

गुजरातमधील गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मोदी सरकारने नॅनोसाठी तुमच्या जमिनी हडप केल्या. पण यातून काय साध्य झाले. याचा मोबदला तुम्हाला मिळाला का, असा सवाल करत हे सरकार फक्त 5-10 भांडवलदारांचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. जीएसटीबाबत ते म्हणाले, देशातील जनतेला कोणत्याही प्रकारचा 'गब्बर सिंग टॅक्स' नको, पण साधा कर हवा. मोदी सरकारने जीएसटीच्या दरात कपात केली असली तरी यामध्ये आणखी बदल करणे आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले, आज मोदीजी आणि भाजप हेच सर्वकाही झाले आहे. केंद्रात आणि गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यांच्याकडे खूप शक्ती आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण काँग्रेसकडे सत्य असल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल. काँग्रेस आणि जनतेच्या दबावामुळेच सरकारला जीएसटीत बदल करावा लागला, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, गुजरात देशाला मार्ग दाखवू शकतो. देशात जे काही बदल घडतील, ते गुजरात आणि या निवडणुकीपासूनच घडतील. या निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल. राज्यात काँग्रेसची पुन्हा सत्ता आल्यावर महिलांना निवडणुकांचे तिकीटे देण्यात येतील. तसेच संसदेत त्यांच्या आरक्षणावर विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: 'In 2019, we will reduce GST rate to just one slab of 18%," says Rahul Gandhi