सोन्याचे दागिने, अलिशान गाड्या घेऊन 'गोल्डन बाबा' कंवर यात्रेसाठी सज्ज

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

200 किमी असणाऱ्या या यात्रेत सहभागी होण्यासाठी ते सोमवारी (ता. 7) दिल्लीत दाखल झाले. मागील वर्षी गोल्डन बाबा 14.5 किग्रॅ. वजनाचे सोन्याचे दागिने घालून य़ात्रेत सहभागी झाले होते, तर या वर्षी ते 20 किग्रॅ. वजनाचे दागिने घालून यात्रेत सहभागी होणार आहेत.  

गाझियाबाद : सोन्याच्या 25 साखळ्या, 21 अलिशान गाड्या अशी जय्यत तयारी करून 58 वर्षीय सुधीर मक्कर म्हणजेच 'गोल्डन बाबा' हे गाझियाबादमधील कंवर यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी सिद्ध आहेत. दरवर्षी सोन्याचे दागिने घालून व असंख्य अलिशान गाड्या घेऊन यात्रेत सहभागी होणारे बाबा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 

200 किमी असणाऱ्या या यात्रेत सहभागी होण्यासाठी ते सोमवारी (ता. 7) दिल्लीत दाखल झाले. मागील वर्षी गोल्डन बाबा 14.5 किग्रॅ. वजनाचे सोन्याचे दागिने घालून य़ात्रेत सहभागी झाले होते, तर या वर्षी ते 20 किग्रॅ. वजनाचे दागिने घालून यात्रेत सहभागी होणार आहेत.  

'माझ्याकडील सोने हे देवाच्या आशिर्वादामुळे वाढले आहे. जर देवाच्या मनात असेल आणि माझी तब्येत चांगली राहिली तर मी दर वर्षी कंवर यात्रा करेन. मला पोटदुखीचा त्रास आहे, त्यावर मागील 3 वर्षे उपचार सुरू आहेत, मात्र कोणत्याही प्रकारचे निदान झाले नाही,' असे गोल्डन बाबांनी सांगितले. 2018 मधील माझ्या कंवर यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असेल, असे त्यांनी मागील वर्षी सांगितले होते. त्यांनी या यात्रेसाठी अलिशान गाड्या, दिल्लीतील सर्वोत्कृष्ठ केटरर, वॉटरप्रुफ टेंट, रूग्णवागहिका व डॉक्टर यांच्यावर 1.25 कोटी रूपये खर्च केला आहे.  

गोल्डन बाबांकडे याशिवाय 21 लॉकेट्स, हातात घालायची कडी तसेच 27 लाखांचे रॉलेक्स घड्याळही आहे. तसेच त्यांनी 1 बीएमडब्लू, 3 फॉर्चुनर, 2 ऑडी व 2 इन्होवा गाड्या या यात्रेसाठी खरेदी केल्या आहेत. आध्यात्माकडे वळण्यापूर्वी मक्कर हे गांधीनगरमध्ये कपडे व जमिन व्यावसायिक होते. 

Web Title: 20kg gold 21 luxury cars team of Golden Baba in Ghaziabad for Kanwar yatra