आंध्र-ओडिशा सीमेवर चकमकीत 21 नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

ओडिशातील मल्कानगरी जिल्ह्यातील जंत्री जंगलात आज पहाटे पोलिसांना नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

भुवनेश्वर - आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर मल्कानगिरी जिल्ह्यातील जंगलात आज (सोमवार) पहाटे आंध्र प्रदेश व ओडिशा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 21 नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत.

पोलिस अधीक्षक राहुलदेव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील मल्कानगरी जिल्ह्यातील जंत्री जंगलात आज पहाटे पोलिसांना नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मल्कानगिरी जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. या कारवाईत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

या चकमकीत ठार झालेले नक्षलवादी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. या नक्षलवाद्यांकडून चार एके 47 रायफल्स, तीन एसएलआर आणि काही गावठी बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह चित्रकोट येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहेत. 

Web Title: 21 Maoists killed in Odisha-Andhra border