भाजप खासदार बंडारू दत्तात्रेय यांच्या 21 वर्षीय मुलाचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

भारतीय जनता पक्षाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा 21 वर्षीय मुलगा वैष्णव याचे बुधवारी (ता. 23) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुशीराबाद (हैदराबाद) : भारतीय जनता पक्षाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा 21 वर्षीय मुलगा वैष्णव याचे बुधवारी (ता. 23) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक ओढावलेल्या या प्रसंगामुळे दत्तात्रेय कुटुंब कमालीच्या धक्क्यात आहेत. 

वैष्णव हा एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात होता. मध्यरात्री त्याच्या छातीत दुखत असल्या कारणाने त्याला मुशीराबादच्या गुरूनानक रूग्णालयात हलविले, पण तेथे त्याने अखेरचा श्वास घेतला. 

घरातील अशा तरूण मुलाच्या जाण्याने दत्तात्रेय कुटुंबाला दुःख अनावर झाले आहे.  

Web Title: 21 years old son of bjp mp bandaru dattatrey expired