तांत्रिक बिघाडाचा "एअर इंडिया'ला फटका 

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया या विमान कंपनीच्या चेक-इन काउंटरवरील संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे आज सुमारे दोन डझन विमान उड्डाणांना उशीर झाला. 
 

नवी दिल्ली - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया या विमान कंपनीच्या चेक-इन काउंटरवरील संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे आज सुमारे दोन डझन विमान उड्डाणांना उशीर झाला. 

"एअर इंडिया'च्या प्रवक्‍त्याने सांगितले, की चेक-इन काउंटरवरील संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे येथील विमानतळावरून होणाऱ्या 23 विमान उड्डाणांना उशीर झाला. तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे दुपारी एक ते 2.30 वाजण्याच्या कालावधीमध्ये "चेक-इन'सह इतर सेवा प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले. जागतीक पातळीवर सेवा पुरविणाऱ्या "एसआयटीए' ही कंपनी "एअर इंडिया'ला संगणकप्रणालीशी संबंधित सेवा पुरवते. 

Web Title: 23 Air India flights delayed due to software malfunction, passengers hit