उत्तर प्रदेशात आश्रम शाळेतून 24 मुलींची सुटका

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

या आश्रम शाळेतून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याचा आरोपावरून पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला आणि 24 मुलींची सुटका केली. अजूनही या आश्रम शाळेतील 18 मुली बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या आश्रम शाळेला टाळे ठोकण्यात आले आहे. बेपत्ता मुलींची चौकशी करण्यात येत आहे.

वाराणसी : बिहारमधील मुझफ्फरनगर येथील मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील देवरिया येथील आश्रम शाळेतून 24 मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

या आश्रम शाळेतून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याचा आरोपावरून पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला आणि 24 मुलींची सुटका केली. अजूनही या आश्रम शाळेतील 18 मुली बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या आश्रम शाळेला टाळे ठोकण्यात आले आहे. बेपत्ता मुलींची चौकशी करण्यात येत आहे.

देवरिया पोलिस ठाण्याचे पोलिस अधीक्षक रोहन पी. कनाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेटिया येथून 10 वर्षांची मुलगी बेपत्ता झालेली झाली होती, ती सापडल्यानंतर या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला आहे. या मुलीने सांगितले की तिच्या काही मैत्रिणींना मोलकरणीप्रमाणे वागविण्यात येत आहे. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. या आश्रम शाळेला देण्यात आलेल्या मान्यतेची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. या आश्रमशाळेच्या प्रमुख गिरीजा त्रिपाठी आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: 24 girls rescued from Shelter home in Deoria