24 हजार भाविकांनी घेतले अमरनाथचे दर्शन

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

जम्मू  : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेनिमित्त आत्तापर्यंत जवळपास 24 हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. दरम्यान, भाविकांची तिसरी तुकडी गुहेच्या दिशेने रवाना झाली असल्याची माहिती अमरनाथ देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली. 

दर्शनासाठी दूरदूरवरून आलेल्या भाविकांपैकी 15 हजार भाविकांनी काल दर्शन घेतले होते. तर आज सकाळपर्यंत एकूण 23 हजार 787 जणांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी तयार असलेली तिसरी तुकडी भगवतीनगर येथून भल्या पहाटे पोलिस बंदोबस्तात गुहेच्या दिशेने मार्गस्थ झाली. या तुकडीत 1842 भाविकांचा समावेश आहे. ही तुकडी संध्याकाळपर्यंत बाल्टल आणि पहलगाम तळावर पोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: 24 Thousand devotees visits Amarnath in two days

टॅग्स