International Yoga Day 2019 : 'ही' आहेत जगाने मान्यता दिलेली योगासने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये योग दिन साजरा करण्यास सुरवात केली. 21 जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असल्याने या दिवशी योग दिन साजरा केला जातो. आत्मा आणि शरीर यांच्यात समन्वय साधण्यासाठी योगाची मदत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014-15 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा, असा प्रस्ताव युनोमध्ये मांडला आणि संपूर्ण जगाने तो बहुमताने मंजूर केला. योगशास्त्राला राजाश्रय मिळाला आणि पूर्वीपेक्षाही जास्त वेगाने योगप्रचार वाढू लागला. आत्मा आणि शरिर यांचा समन्वय साधायचा असेल तर योगा हा उत्तम मार्ग आहे. 21 जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असल्याने या दिवशी योग दिन साजरा केला जातो. 

योग साधनेचे अनेक उपयोग आहेत. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ लाभण्यासाठी ही योगासने केल्यास त्यांचा फायदा होतो. 

1) ताडासन 
लाभ :
1. शरीराची उंची वाढविण्यास मदत होते. 
2. एकाग्रता वाढते, शारीरिक आणि मानसिक तोल सांभाळण्याची सवय. 

Image may contain: 1 person

2) वृक्षासन 
लाभ ः 
1. शरीर संतुलित, सहनशील होण्यास मदत. 
2. स्नायूंची बळकटी आणि एकाग्रता वाढते. 

Image may contain: 1 person

3) पादहस्तासन 
लाभ ः 
1. पायाच्या आणि पाठीच्या मणक्‍याची लवचिकता वाढते. 
2. पोटावर योग्य दाब येऊन पचनक्रिया सुधारते. 

Image may contain: one or more people, shoes and text

4) अर्धचक्रासन 
लाभ ः 
1. कंबरेची आणि मणक्‍याची बळकटी वाढते. 
2. श्‍वसनक्षमता वाढण्यासह मानेचे, छातीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. 

Image may contain: one or more people and text

5) त्रिकोणासन 
लाभ ः 
1. कंबरेचे, मानेचे, पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 
2. शरीराची रचना सुधारते आणि श्‍वसनाची कार्यक्षमता वाढते. 

Image may contain: one or more people and text

6) भद्रासन 
लाभ ः 
1. गुडघे, मांडीचे आणि नितंबाचे स्नायू बळकट होता. 
2. गुडघ्यांचे दुखणे कमी होते. 

Image may contain: 1 person

7) वज्रासन 
लाभ ः 
1. भद्रासनातील सर्व लाभ मिळतात, तसेच पचनक्रिया सुधारते. 
2. महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटातील तक्रारी असतात त्या कमी होतात. 

Image may contain: 1 person

8) अर्ध उष्ट्रासन 
लाभ ः 
1. पाठदुखीपासून मुक्ती मिळते. 
2. डोके आणि हृदय यांतील रक्ताभिसरण सुधारते. 

Image may contain: one or more people and text

9) उष्ट्रासन 
लाभ ः 
1. मणक्‍याची लवचिकता वाढते. 
2. डोके आणि हृदय यांतील रक्ताभिसरण सुधारते. 

Image may contain: one or more people

10) शशांकासन 
लाभ ः 
1. तान, क्रोध कमी होण्यास मदत होते. 
2. पचनक्रिया सुधारते, पायांच्या तक्रारी बंद होतात. 

No photo description available.

11) उत्तान मण्डूकासन 
लाभ ः 
1. पचनक्रिया सुधारते, पायांच्या तक्रारी बंद होतात. 
2. मांडीच्या आतील स्नायूंचे आरोग्य सुधारते. 

Image may contain: 1 person

12) वक्रासन 
लाभ ः 
1. पाठीची लवचिकता वाढते. 
2. मधुमेहासाठी गुणकारी. 

Image may contain: 1 person

(पोटावरील आसने) 
13) मकरासन 
लाभ ः 
1. शरीराचा थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती मिळते. 
2. तणाव आणि चिंता कमी होते. 

Image may contain: one or more people

14) भुजंगासन 
लाभ ः 
1. पाठीची ताकद आणि लवचिकता वाढते. 
2. पोट, छाती यांची कार्यक्षमता वाढते. 

Image may contain: 1 person

15) शलभासन 
लाभ ः 
1. सायटिका आणि पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे कमी होते. 
2. स्थूलता कमी होते आणि पचनशक्ती वाढते. 

Image may contain: 1 person

(पाठीवर झोपण्याची आसने) 
16) सेतुबंधासन 
लाभ ः 
1. मणक्‍याचे आजार कमी होतात. 
2. पायाची, पाठीची, खांद्याची बळकटी आणि फुफ्फुसे, हृदय सक्षम होण्यास मदत. 

Image may contain: one or more people

17) उत्तान पादासन 
लाभ ः 
1. पोटाची चरबी कमी होण्यास मदत. 
2. पचनशक्ती सुधारते. 

No photo description available.

18) अर्धहलासन 
लाभ ः 
1. पोटाची आणि पाठीची ताकद वाढविण्यास मदत. 
2. पचनशक्ती सुधारते. 

Image may contain: one or more people

19) पवनमुक्तासन 
लाभ ः 
1. शरीराचा ताण कमी होतो. 
2. मन शांत राहते आणि शरीर सक्षम होते. 

Image may contain: one or more people

20) शवासन 
लाभ ः 
1. शरीर आणि मनावरील तान कमी होण्यास मदत. 
2. प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते. 

Image may contain: one or more people

21) कपालभाती 
लाभ ः 
1. सर्दी, अस्थमा, कफ आणि मायग्रेन यांसाठी लाभदायक. 
2. शरीर आणि चेहरा तेजोमय बनतो. 

Image may contain: 1 person

22) अनलोम प्राणायम 
लाभ ः 
1. शरीरातील ऊर्जेचे वहन करणे आणि शरीरशुद्धी करणे. 
2. मन शांत, एकाग्र करणे. 

Image may contain: 1 person

23) शीतली प्राणायाम 
लाभ ः 
1. उष्णता आणि पित्ताचा त्रास कमी होतो. 
2. झोप शांत लागते. 

Image may contain: 1 person

24) भ्रामरी प्राणायाम 
लाभ ः 
1. मानसिक ताण-तणाव कमी होतो. 
2. पंचेंद्रियांची क्षमता वाढते. 

Image may contain: 1 person

25 ) ध्यानमुद्रा 
लाभ ः 
1. सकारात्मक भावना विकसित होते. 
2. मन एकाग्र होऊन मनोबल वाढते. 

Image may contain: 1 person

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 yogas to know about on International Yoga Day 2019