उत्तर प्रदेशवर निसर्ग कोपला 

पीटीआय
रविवार, 10 जून 2018

नुकसानभरपाईचे आदेश 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची दखल घेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष झाले, तर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये काल (ता.8) रात्री आलेले धुळीचे वादळ आणि ठिकठिकाणी कोसळेल्या विजांमुळे तब्बल 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आज अधिकृत सूत्रांनी दिली. राज्यातील अकरा जिल्ह्यांना याचा फटका बसला असून, जाणपूर व सुलतानपूर जिल्ह्यात यामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ उन्नावमध्ये चार, चांदौली व बहराईचमध्ये सहा, रायबरेलीत दोन; तर मिर्झापूर, सीतापूर, अमेठी आणि प्रतापगड येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. कन्नौज जिल्ह्यातही वादळाने थैमान घातले मात्र, येथे कोणती जीवितहानी झाली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सुलतानपूर जिल्ह्यात वीज कोसळून सहा जण गंभीररीत्या भाजले आहेत. अमदेवा गावात मोकळ्या जागेत खेळत असणाऱ्या तीन लहान मुलांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, हवामान विभागाने उद्या (ता.10) राज्यातील अनेक भागांत जोरदार वादळाचा इशारा दिला आहे. 

नुकसानभरपाईचे आदेश 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची दखल घेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष झाले, तर संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Web Title: 26 Dead In Uttar Pradesh Due to Thunderstorm, Lightning