आणखी 26 मुली उत्तर प्रदेशातून बेपत्ता 

यूएनआय
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

प्रतापगड (यूएनआय) : बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये संपूर्ण देश धक्‍क्‍यात असताना उत्तर प्रदेशात देवरिया आणि हरदोईनंतर बालिकागृहातील लैंगिक शोषणासंबंधीची तिसरी घटना उजेडात आली आहे. या वेळी प्रतापगडममधून 26 मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. 

जिल्हाधिकारी शंभू कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने बुधवारी रात्री अचलपूर आणि अष्टभुजानगर येथील बालिकागृहांवर छापे टाकले आणि त्या ठिकाणी त्यांना 26 मुली बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यानंतर अचलपूर केंद्र बंद करण्यात आले. हे केंद्र इंद्रजित सिंह नावाची व्यक्ती चालवत होती. 

दरम्यान, अष्टभुजानगरमधील बालिकागृह भाजपची महिला नेता रमा मिश्रा चालवत असून, तिने बेपत्ता मुलींना सादर करण्याचा दावा केला आहे. मात्र, मुलींच्या अनुपस्थितीविषयी कोणतीही नोंद आढळलेली नाही. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, की या मुली बेपत्ता नाहीत, तर अनुपस्थित आहेत आणि मालकाने त्यांना सादर करू असे सांगितले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि यामध्ये कोणी दोषी आढळल्यास बालिकागृह आणि त्यांच्या मालकांविरुद्ध एफआयआर दाखल करू. 

Web Title: 26 more missing girls from Uttar Pradesh