तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

टीम ईसकाळ
Wednesday, 4 December 2019

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे व्हर्जन असणाऱ्या ही पॉर्न साईट जगातील सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या पॉर्न साईट्सपैकी एक आहे. या साईटवर तब्बल 80 लाख लोकांनी तिचा बलात्काराचा व्हिडिओ सर्च केला आहे. 

हैदराबादमधील 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आलं. ही घटनाच एखाद्या माणसाला पूर्णपणे हादरून सोडणारी असतानाच देशात त्याहूनही नीच आणि घृणास्पद गोष्ट घडली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे व्हर्जन असणाऱ्या एका पॉर्न साईटवर तिचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे व्हर्जन असणाऱ्या ही पॉर्न साईट जगातील सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या पॉर्न साईट्सपैकी एक आहे. या साईटवर तब्बल 80 लाख लोकांनी तिचा बलात्काराचा व्हिडिओ सर्च केला आहे. 

Image may contain: text

रविवार संध्याकाळपर्यंत तिचे नाव या पॉर्न साईटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड करत होते. या प्रकरणातील चार आरोपींनी यापूर्वीच गुन्ह्याची कबूली दिली असूनही अद्याप त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल केला गेलेला नाही. 

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'

फक्त पॉर्न साईटवरच नाही तर गुगल सर्चमध्ये सुद्धा Pri***** ***** Rape Video आणि Pri***** ***** Porn हे दोन शब्द सर्वाधिक सर्च केले गेले होते. यामध्ये देशातील सर्वाधिक स्रच हे पश्चिम बंगाल राज्यातून केलं गेलं होतं. त्यापाठोपाठ तेलंगणाचा क्रमांक येतो. 

No photo description available.

तिच्यावर बलात्कार झाल्यावर तिची जगण्याची अखेरी झुंज, तिची अखेरची किंकाळी ऐकण्यासाठी लोकांनी तिच्या बलात्काराचा व्हिडिओ पॉर्न साईट आणि गुगलवर सर्च करुन तिचं हसू केलं आहे. आपल्या समाजावर, समाजातल्या माणसांच्या वृत्तीवर आता चिड नाही तर कीव येते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांसह ती 80 लाख लोकं ज्यांनी तिच्या बलात्काराचा व्हिडिओ त्या पॉर्न साईटवर सर्च केला ते सुद्धा तिचे आणि आपल्या समाजाचे बलात्कारीच आहेत. 

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

तिच्या नावाचा टॅग या पॉर्न साईटवरुन काढून टाकण्यात यावा यासाठी change.org वर एक मोहिम सुरु करण्यात आली आहे. यावर साईटवर जाऊन तुम्हीसुद्धा पेटीशन साईन करुन या मोहिमेत सहभागी होऊ शकता.

या घृणास्पद कृत्यावर व्यक्त व्हा!
तुमचे मत सोशल मीडियावर #WomenSafety हा हॅशटॅग वापरुन सकाळला टॅग करुन शेअर करा. तसेच यावर तुमची मतं webeditor@esakal.com वर पाठवा.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

अशा विकृतीबद्दल मानसोपचारतज्ञ काय म्हणातात?
बलात्कार हा अशा व्यक्तींकडून होतो, ज्यांना दुसऱ्या व्यक्तीवर अधिकार गाजवायचा असतो. केवळ शारिरीक सूख मिळावणे, हा त्यातून उद्देश नसतो. अशा लोकांना दुसऱ्याला त्रास झालेला बघून आनंद होत असतो. इतकेच काय तर त्यांना प्रत्येक विकृत गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो. आता जे लोक हा बलात्काराचा व्हिडीओ सर्च करत आहेत, ते ही अशाच विकृत मानसिकतेचे असते. असे व्हिडीओ पाहणारे मुळात घाबरट असतात. ते स्वतः काही करत नाहीत, पण दुसऱ्यांनी केलेल्या विकृत गोष्टींमधून ते आनंद मिळवतात. मानवता ही गोष्टच त्यांच्यात नसते. त्यांना स्वतःला इजा झालेली आवडत नाही. पण दुसऱ्यांना झालेली पाहायला आवडते, ही गोष्टच फार चुकची आहे. यांना इतरांबद्दल आत्मियता नसते. ते बहुतांशी वेळी एकटे असतात, त्यांना नाती टिकवता येत नाही. 
- डॉ. सागर पाठक, स्त्री रोगतज्ज्ञ व लैंगिक समुपदेशक

माणसाची विकृतीच तशी असते. याला ‘मिसींग टाईल्स’ फिलोसॉफी म्हणतात. अशा लोकांना चांगली गोष्ट दिसत नाही, पण वाईट गोष्ट पटकन दिसते. या प्रकारची लोक जास्त असतात. त्यामुळे अशा गोष्टींना लवकर प्रसिद्धी मिळत जाते. असा व्हिडीओ सर्च करण्यामागेही हीच कारणे आहेत. यावर उपचार करणे गरजेचे आहे. परिणांमाचा विचार न करता जी गोष्ट केली जाते, त्यातून ही विकृती जन्म घेत असते. अशा लोकांसाठी समुपदेशनाची गरज आहे. 
- स्मिता जोशी, मानोसोपचारतज्ज्ञ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 years old Hyderabad rape case victim was searched 8 million times on porn site