मुंबई हल्ला खटला; कोर्टाची सरकारला नोटीस 

पीटीआय
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई हल्ला खटल्याप्रकरणी रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाला नोटीस बजावून 24 भारतीय साक्षीदारांना हजर करण्यासंदर्भातील उत्तर आठवड्याच्या आत द्यावे, असे म्हटले आहे. 
 

लाहोर : मुंबई हल्ला खटल्याप्रकरणी रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाला नोटीस बजावून 24 भारतीय साक्षीदारांना हजर करण्यासंदर्भातील उत्तर आठवड्याच्या आत द्यावे, असे म्हटले आहे. 

मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यास दहा वर्षे होत असून आतापर्यंत पाकिस्तानातील एकाही आरोपीला याप्रकरणी शिक्षा झालेली नाही. यावरूनच पाकिस्तान मुंबई हल्ला खटला चालवण्याबाबत किती उदासीन आहे, हे कळते. रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने अदिआला जेल (रावळपिंडी) येथे काल या खटल्याची सुनावणी केली. या वेळी पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाला नोटीस बजावून भारतीय साक्षीदारांना हजर करण्याबाबतचे उत्तर 5 जुलैच्या आत द्यावे, असे म्हटले आहे. मात्र सरकारी वकिलाने भारतीय नागरिकांना पाकिस्तानात पाठवण्याबाबत भारत सरकार अनुत्सुक असल्याचे न्यायालयाला सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी 5 जुलैला होणार आहे. 

Web Title: 26/11 case: Pakistan court issues notice to interior ministry to produce Indian witnesses