बस पेटून बिहारमध्ये 27 प्रवासी मृत्युमुखी 

पीटीआय
शुक्रवार, 4 मे 2018

बिहारमधील मुझफ्फरपूरहून नवी दिल्लीला निघालेली बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळून पेटल्याने 27 प्रवाशी होरपळून मृत्युमुखी पडले. राष्ट्रीय महामार्ग क्र. 28 वर मोतीहारी जिल्ह्यातील बेलवा येथे ही दुर्घटना घडली. 
 

पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूरहून नवी दिल्लीला निघालेली बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळून पेटल्याने 27 प्रवाशी होरपळून मृत्युमुखी पडले. राष्ट्रीय महामार्ग क्र. 28 वर मोतीहारी जिल्ह्यातील बेलवा येथे ही दुर्घटना घडली. 

ही बस खासगी होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळून पेटली. या दुर्घटनेत 27 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पूर्व चंपारण जिल्ह्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्याची माहिती राज्याचे आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री दिनेशचंद्र यादव यांनी दिली. बसमधील चार प्रवाशांना वाचविण्यात यश आले. होरपळून जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. खड्ड्यात कोसळल्यावर बस लगेच पेटली, त्यामुळे आतील प्रवाशांना वाचविता आले नाही, असे ते म्हणाले. 
 

Web Title: 27 charred to death as bus catches fire after accident in Bihar