कलम 35ए वरुन काश्मीर तापलं ! अतिरिक्त 28 हजार जवान तैनात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काश्मीर खोऱ्यात 28 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात भारतीय जवान तैनात केलेत. यामध्ये सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काश्मीर खोऱ्यात 28 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात भारतीय जवान तैनात केलेत. यामध्ये सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शहरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर जाण्याच्या सर्व रस्त्यांवर सीआरपीएफचे जवान बंदोबस्त करत आहेत. स्थानिकांनी ही परिस्थिती पाहून आवश्यक लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. 

परदेशी दहशतवादी पोलिस कर्मचाऱ्यांना निशाना बनवू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर 10 हजार अतिरिक्त जवान काश्मीरमध्ये तैनात केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

कलम 35 ए हटविण्यावरुन काश्मीरमध्ये वातावरण तापू लागलंय. कलम 35 ए हटविणे ही राजकीय समस्या आहे. त्या समस्येचं निरसन लष्करी सैन्य करु शकत नाही. कलम 35 ए म्हणजे बॉम्ब आहे. जर त्याला हात लावाल तर स्फोट होईल असा इशारा देत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती कलम 35 ए हटविण्याला विरोध केला आहे. 

देशातील विविध भागातील सीआरपीएफच्या जवानांना काश्मीरला पाठविण्यात आलं आहे. मागे 3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर खोऱ्यात दौरा केला होता. त्यावेळी गिलानी, मीरवाइज आणि जेकेएलएफचा मुख्य यासीन मलिक यांच्या संघटनेकडून बंद पुकारण्यात आला. तर 10 सप्टेंबर 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काश्मीर दौरा करण्यात आला. तेव्हाही जेआरएल या संघटनेकडून काश्मीर खोऱ्यात बंद पुकारण्यात आला होता. तर काश्मीरमधील कलम 370 हटविण्यावरही केंद्र सरकार विचार करत आहे. त्याला फारुख अब्दुला यांनी विरोध केला होता. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा वाढविण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. 

कलम 35 ए हे जम्मू काश्मीरमधील लोकांना विशेष अधिकार देणारे कलम असून या कलमामुळे बाहेरील लोकांना तेथे कोणतीही स्थावर मालमत्ता घेता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 280 companies of security forces being deployed in Kashmir