राजस्थानात 2800 मद्यविक्री दुकाने बंद होणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जयपूर -  महामार्गावरील मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजस्थान सरकारने त्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. राज्यात एकूण 7 हजार 760 मद्य विक्रीची दुकाने असून, त्यापैकी 2 हजार 800 दुकाने किंवा ही राष्ट्रीय, राज्य महामार्गालगत येत असल्याचे आढळले आहे. ही दुकाने लवकरच पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त ओ. पी. यादव यांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित दुकानांच्या परवान्यांचे 31 मार्च 2017 मध्ये नूतनीकरण होणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: 2800 liquor shops closed in rajasthan