काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

काश्मीरमध्ये शुक्रवारी कोठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाही. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच राज्यातील निर्बंध 15 ऑगस्टनंतर उठविण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार एक-एक निर्बंध उठविण्यात येत आहेत.

श्रीनगर : काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहेत. काश्मीरमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. काश्मीरमधील पाच जिल्ह्यात आजपासून इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील 2जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. तब्बल 12 दिवसांनंतर या सेवा पुर्ववत झाल्या असून, शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

काश्मीरमध्ये शुक्रवारी कोठेही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या नाही. काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकतीच राज्यातील निर्बंध 15 ऑगस्टनंतर उठविण्यात येतील असे सांगितले होते. त्यानुसार एक-एक निर्बंध उठविण्यात येत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2G mobile internet services have been restored in Jammu And Kashmir