मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; 3 जवान हुतात्मा, तर 6 जखमी

Jawan_India
Jawan_India

इम्फाळ : मणिपूरमध्ये भारतीय लष्कराच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 3 जवान हुतात्मा झाले. तर आणखी 6 जण जखमी आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.

म्यानमारच्या सीमेपासून असलेल्या चंदेलमध्ये स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांमार्फत करण्यात आलेल्या 4 आसाम रायफल्स युनिटचे 3 कर्मचारी हुतात्मा झाले. तर यामध्ये 6 जण जखमी झाले. 

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. जखमी जवानांना इम्फाळ पश्चिम जिल्हास्थित लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मणिपूरच्या बॉर्डर जिल्ह्याचे चंदेल येथे घडली. 

आसाम रायफल्सचे पथक त्यांच्या खोंगतलच्या तळाकडे परतत होते. त्यावेळी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर आयईडीचा मोठा स्फोट झाला, अशी माहिती चकपिकारोंगचे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

पीएलएकडून हल्ला

इम्फाळपासून सुमारे 100 किमी दूर असलेल्या चंदेर जिल्ह्यात बुधवारी (ता. 29) रात्री ही घटना घडली. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. जखमी जवानांना इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच भारत आणि म्यानमारच्या सीमेवरही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

तीन जवाना हुतात्मा

आसामचे हवालदार प्रणय कलिता, नागालँडचे रायफलमॅन मेठा कोन्याक आणि मणिपूरचे रायफलमॅन रतन सलाम हे जवान यामध्ये हुतात्मा झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com