निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; 3 ठार 10 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

अमृतसरमधील राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

अमृतसर- अमृतसरमधील राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला झाला आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनेड फेकला. दुपारी 12 च्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे झालेल्या स्फोटात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

''मोबाईलवर बातम्या वाचण्यासाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा''

स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ माजला. तसेच धावपळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. ही माहिती अधिकृतरित्या आयजी (सरहद्द) सुरिंदर सिंह परमार यांनी दिली आहे.

Web Title: 3 dead & 10 injured in the blast at Nirankari Bhawan in Amritsars Rajasansi village