केरळमध्ये दुर्मिळ निपाह रोगाने घेतला तिघांचा बळी; सरकार अलर्ट

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

निपाह हा दूर्मिळ आणि तितकाच घातक व्हायरस असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हायरस नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, या व्हायरमुळे 3 जण ठार झाले आहेत. तर, इतर 6 जण अत्यावस्त आहेत.

कोझिकोड : केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात काही जणांना निपाह या दुर्मिळ रोगाची लागण झाली असून, आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. तर, दोन जण गंभीर आहेत. या आजाराची दखल घेत केंद्र सरकारने केरळमध्ये पथक पाठविले आहे.

निपाह हा दूर्मिळ आणि तितकाच घातक व्हायरस असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हायरस नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, या व्हायरमुळे 3 जण ठार झाले आहेत. तर, इतर 6 जण अत्यावस्त आहेत. एकूण 25 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. ते सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. केरळचे आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावून चर्चा केली. या चर्चेनंतर या व्हायरसने तिघांचा बळी घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय पथकाला केरळमध्ये जाण्यास सांगितले आहे. 

मणिपूर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीतील अहवालात खुलासा करण्यात आला आहे की, हा एक दुर्मिळ व्हायरस असून, राज्यात हा शक्यतो पहायला मिळत नाही. 'त्या' तिघांच्या मृत्यूला हा व्हायरसच जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, या व्हायरसचा नमूना पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीला पाठविण्यात आला आहे. पुण्यातील प्रयोगशाळेचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी आशा आहे.

Web Title: 3 Dead From Mysterious Nipah Virus In Kerala Centre Sends Team