गोवा : चार दिवसांतील तीन अपघातात तिघांचे बळी

accident
accident

मडगाव : नववर्षाच्या स्वागताची धूम असताना दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात मागच्या चार दिवसांत झालेल्या तीन अपघातांत तीन तरुणांचे बळी गेले. हे तिन्ही अपघात मध्यरात्री दीडच्या दरम्यान घडले. 

सुरावली येथे बुधवार - गुरुवारच्या मध्यरात्री दीडच्या दरम्यान दुचाकीला झालेल्या अपघातात जोएल फर्नांडिस (20 वर्षे) या मडगाव येथील तरुणाचे निधन झाले. दुचाकीच्या मागे बसलेला मिलिंद भोसले हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे. 

दोघेही तरुण लग्न समारंभ आटोपून मडगावी परत येत होते. सुरावली येथे नियंत्रण गेल्याने दुचाकीची रस्त्याच्या बाजुला असलेल्या कुंपण भिंतीला धडक बसली. यात गंभीर जखमी झालेला जोएल याचे निधन झाले. मिलिंद याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर केपे येथील इस्पितळात उपचार सुरु आहेत. 

रविवार - सोमवारच्या मध्यरात्री घोगळ येथे कारची झाडाला धडक बसल्याने ब्रायसी फर्नांडिस (20 वर्षे) या कोलवा येथील तरुण संगीत कलाकारेचे निधन झाले होते. या अपघातात ब्रायसी याचे तीन मित्र जखमी झाले होते. तर मुशीर - बेतुल येथे मंगऴवार - बुधावरच्या मध्यरात्री झालेल्या कार अपघातात जोएल आॅलीवर फर्नांडिस (18 वर्षे) या नुवे - काब द राम येथील तरुणाचे निधन झाले. या अपघातात दोन मुलांसह कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com