एका दिवसात चित्रपट 120 कोटी कमवितात; मग मंदी कुठाय?: प्रसाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

गांधी जयंतीनिमित्त असलेल्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी 120 कोटी रुपये कमविले. देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याशिवाय एकाच दिवसात इतकी कमाई होणे शक्‍य आहे का? इलेक्‍ट्रॉनिक, माहिती आणि तंत्रज्ञान, मुद्रा कर्ज योजना, व्यापार ही क्षेत्रे चांगल्या स्थितीत आहेत.

मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला. 

येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद म्हणाले, "गांधी जयंतीनिमित्त असलेल्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी तीन हिंदी चित्रपटांनी 120 कोटी रुपये कमविले. देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याशिवाय एकाच दिवसात इतकी कमाई होणे शक्‍य आहे का? इलेक्‍ट्रॉनिक, माहिती आणि तंत्रज्ञान, मुद्रा कर्ज योजना, व्यापार ही क्षेत्रे चांगल्या स्थितीत आहेत. सर्व जणांना सरकारी नोकऱ्या देऊ असे आम्ही कधीही म्हटलेलं नाही. मात्र, काही जण बेरोजगारीचे चुकीचे चित्र उभे करत आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Films Made 120 Crore In A Day Ravi Shankar Prasad Says Economy Fine