जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी तीन समूहांची इच्छा; 'एतिहाद'ची इच्छा नाही 

जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी तीन समूहांची इच्छा; 'एतिहाद'ची इच्छा नाही 

नवी दिल्ली : बंद पडलेली जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी तीन कंपन्या समोर आल्या असल्याचे बँकाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, ‘एतिहाद एअरवेज पीजेएससी’ने यामध्ये आपली इच्छा नसल्याचे दाखवले आहे.

एयरलाईनच्या बोलीची प्राथमिक रक्कम जमा करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत एतिहाद एयरवेजने बोलीची रक्कम जमा केली नव्हती. जेट एअरवेज कंपनीत एतिहाद एयरवेज या कंपनीची 24 टक्के हिस्सेदारी आहे.

आतापर्यंत एकूण तीन कंपन्यांनी जेट एअरवेज खरेदी करण्यात इच्छा असल्याचे पत्र कंपनीकडे दिले असून बँकेकडून त्या कंपन्यांची अधिकृत नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. हिंदूजा समूहाकडूनही कुठल्याही प्रकारची बोली लावण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com