पुलाचे काम सुरू असताना तीन कामगारांचा मृत्यू 

मिलिंद देसाई
सोमवार, 27 मे 2019

बेळगाव : देसुरजवळ महामार्गाचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून तीन कामगारांचा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.

गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव ते अनमोडपर्यंतच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बेळगावपासुन 15 किमीजवळील देसुरजवळ पुलाचे काम सुरू असताना अचानक माती घसरल्याने तीन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत वडगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली त्यानंतर जेसीबी लावून माती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले त्यानंतर तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात बळी पडलेले तिन कामगार झारखंड येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी व इतर कामगारांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 labors died while working for desur highway