झारखंडमध्ये चकमकीत 3 नक्षलवादी ठार 

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 15) चकमक झाली. या चकमकीच सीआरपीएफच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तर चकमकीत एक सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला आहे. 

रांची : झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 15) चकमक झाली. या चकमकीच सीआरपीएफच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तर चकमकीत एक सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एका कारवाईत दंतेवाडाचे भाजपचे आमदार भीमा मांडवी यांचाही मृत्यू झाला होता. भाजपचा ताफा निवडणूक प्रचाराहून येत असताना भुसुरूंग स्फोट घडविण्यात आला होता त्यात मांडवी यांचा मृत्यू झाला होता. 

सीआरपीएफच्या 7 बटालियनने बेलभा घाट येथील जंग परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. यात तीन दहशतवादी ठार झाले तर, 1 जवानाला आपला जीव गमवावा लागला. या कारवाईत 1 एके 47, 3 मॅगझिन्स, 4 पाईप बॉम्ब एतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Web Title: 3 naxalites killed in CRPF firing at Jharkhand