बीएसएफच्या जवानांनाकडून पाकिस्तानच्या तीन घुसखोरांचा खात्मा; 36 किलो ड्रग्‍स जप्त

सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानचे तीन घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते.
BSF Jawan
BSF Jawanटिम ई सकाळ

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) सांबा सेक्टरमध्ये शनिवारी रात्री पाकिस्तानचे तीन घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, तेथे तैनात असलेल्या बीएसएफच्या (BSF) जवानांनी तिघांनाही ठार केले. यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.बीएसएफने त्यांच्याकडून 36 किलो ड्रग्स (Drugs) जप्त केलेत.

पोलीसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (Lashkar-e-Taiba) दोन दहशतवादी ठार झाले.जकुरा परिसरात शोध मोहीम दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देताना या चकमकीत दोन दहशतवादी (terrorist) ठार झाले.

BSF Jawan
Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर कालवश, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाकिस्तानकडुन घुसखोरीचे अनेक प्रकरणे समोर आली आहे.198 किमी लांबीच्या सीमेवर राहणारे लोक शेजारील देशाकडून होणाऱ्या ड्रोन घुसखोरीवर नजर ठेवण्यासाठी बीएसएफला मदत करतात. सीमा सुरक्षा दल (BSF) ने भारत-पाक सीमेवर ड्रोन घुसखोरीसंबंधित विविध पैलूंबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी 140 हून अधिक ड्रोन जागरूकता कार्यक्रम आयोजित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com