काश्मीरमध्ये 48 तासांत 3 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराच्या स्नायपरने केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये एक भारतीय जवान हुतात्मा झाला. यामुळे मागील 48 तासांत हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या तीन झाली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. 

भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करीत प्रत्युत्तर दिले. त्यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यापूर्वी, राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात मंगळवारी दोन भारतीय जवान हुतात्मा झाले होते. पाकने सीमेपलीकडून तोफांचा मारा करून एका भारतीय वाहनाला लक्ष्य केले.

दरम्यान, दुसरीकडे उरी सेक्टरमधील भागात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असेल्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. सध्या त्या भागात गोळीबार थांबला असला तरी तणाव कायम आहे. 

सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतीय सीमेरेषेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याचा फायदा घेऊन दहशतवादी घुसखोरी करत आहेत. यामुळे आता सीमारेषेवर भारतीय जवनांचा चोख पहारा ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. 

बारामुल्ला भागात बुधवारी एका तरूणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. जाकिर हुसै बडू असे मृत तरूणाचे नाव असून, पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला असून, घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. 

Web Title: 3 soldiers martyred in kashmir