श्रीनगरमध्ये तीन दहशतवादी ठार

स्फोटकेही जप्त; सरपंचाच्या हत्येच्या कटात सहभाग
3 terrorist killed in encounter in shrinagar of kashmir
3 terrorist killed in encounter in shrinagar of kashmirsakal

श्रीनगर : श्रीनगरच्या नौगाम भागात आज लष्कराने केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. तिन्ही दहशतवादी लष्करे तय्यबाशी संबंधित होते आणि त्यांच्याकडे स्फोटक साहित्य देखील आढळून आले. या कारवाईनंतर परिसरात झडतीसत्र सुरू होते.

नौगामच्या चकमकीची माहिती जम्मू काश्‍मीर पोलिसांनी ट्विटरवरून दिली. काश्‍मीर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार म्हणाले, की खानमोहचे सरपंच समीर भट्ट यांच्या हत्येत सहभागी असलेले लष्करे तय्यबाचे तीन दहशतवादी आज सकाळी मारले गेले. या तीन दहशतवाद्यांपैकी २३ वर्षी शाकिब मुश्‍ताक खान हा खानमोहचा रहिवासी होता. तसेच आदिल नबी तेली (वय २३) आणि उमर नबी तेली (वय २५) असे अन्य दहशतवाद्यांची नावे असून ते पॅम्पोरचे रहिवासी होते. आज सकाळी नौगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली.

यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला आणि चकमकीत तिघांना ठार केले. काश्‍मीरमध्ये दोन सरपंचांची हत्या केल्यानंतर सुरक्षा दलाने पुलवामा, गंदरबलसह अनेक भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर सातत्याने काश्मिरात चकमकी होत आहेत. पोलिस महानिरीक्षक विजयकुमार म्हणाले, की पुलवामा चकमकीत जैशेचा कमांडर मारला गेला. तो २०१८ पासून पुलवामा, शोपियॉं भागात सक्रिय होता. त्याने अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com