श्रीनगरमध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार

jammu kashmir
jammu kashmir

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले आहे. तर या चकमकीत जम्मू-काश्मिर दलाचे एक पोलिस हुतात्मा झाले आहेत. श्रीनगरमधील फातेह कादस परिसरात ही चकमक झाली. 

यापूर्वीच फातेह कादल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते, पण दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. त्यामुळे लष्करानेही गोळीबार केला व यात 3 दहशतवादी मारले गेले. यापैकी एक दहशतवादी लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा स्थानिक कमांडर होता.

मात्र या चकमकीत एका जम्मू-काश्मीर पोलिसाला वीरमरण आले, अशी माहिती पोलिस अधिकारी इम्तियाज इस्माइल परे यांनी दिली.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com