esakal | सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

3 terrorists killed in encounter with security forces in Anantnag

अनंतनाग जिल्ह्यातील खलचोरा रुनीपोरा भागात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन : अनंतनागमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील खलचोरा रुनीपोरा भागात सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत एएनआयने अधिकृत वृत्त दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एक एके-47 आणि 2 पिस्तुल ताब्यात घेण्यात आले आहेत. सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. जून महिन्यात झालेल्या १३ चकमकींमध्ये एकूण ४१ दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज (ता. २९) सोमवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकीला सुरुवात झाली होती यामध्ये या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

दरम्यान, दक्षिण काश्मीरमध्ये २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी सांगितलं होते. कोकेरनाग, त्राल आणि ख्रीव यांच्या वरच्या भागात विदेशी दहशतवादी आहेत. दक्षिण काश्मिरात सुमारे २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असून, ते खाली उतरतील आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळेल, तेव्हा आम्ही त्यांचा खात्मा करू, असं काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं आहे.

विदेशी दहशतवाद्यांचे आव्हान मोठे आहे की स्थानिक दहशतवाद्यांचे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दोन्हींचे आमच्यापुढे आव्हान आहे, मात्र आमची दले त्यांचा सामना करण्यासाठी पुरेशी अनुभवी आहेत. त्यांना तोंड देण्याचे कौशल्य गेल्या २५ वर्षांत आम्ही मिळवले आहे. नेमकी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. ती मिळाली की आम्ही त्यांना संपवू असेही विजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

तत्पूर्वी, हिज्बुल मुजाहिद्दीन सुरक्षा दलाला निशाणा बनवत आहे. सर्व दहशतवादी संघटनांपैकी हिज्बुलचे बहुतेक दहशतवादी ठार झाले असून जम्मू-काश्मीरमधील त्राल हा भाग आता हिज्बुलमुक्त झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हा भाग १९८९ पासून हिज्बुल केंद्र बनल्याचंही सांगण्यात आले आहे.

loading image