तीन आमदारांसह 60 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

3 TMC MLA and 50 councillors join BJP at west bengal
3 TMC MLA and 50 councillors join BJP at west bengal

कोलकताः पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना हादरा बसला असून, पक्षाच्या 60 नगरसेवकांनी आणि दोन आमदारांनी आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय, डाव्या पक्षांमधील एका आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवरगिया म्हणाले, 'तीन आमदारांसह 60 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अन्य काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत.'

लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठी कामगिरी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा असून, तृणमूल काँग्रेसने 22 तर भाजपने 18 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2014 मध्ये भाजपचे फक्त दोन खासदार होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com