पत्नीशी भांडणानंतर 3 वर्षीय बालिकेवर बापाचा बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली.

या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी आहे. मात्र, सध्या तो गुडगावमध्ये पत्नी आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहे. या बलात्काराच्या घटनेनंतर पीडित बालिकेला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे तिच्यावर उपचार केले जात आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की ''आरोपीला 3 आणि एक वर्षाची अशा दोन मुली आहेत. दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. त्यामुळे त्याची पत्नी शेजारी राहणाऱया मावशीकडे गेली होती. तिने एक वर्षाच्या मुलीलासोबत नेले होते. मात्र, तीन वर्षीय बालिका त्याच्यासोबत होती. त्यादरम्यान त्याने बालिकेवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित बालिका बेशुद्ध झाली. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही आरोपीविरोधात 'पॉस्को'अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 3 year old girl raped by Father after Clashes with wife