पती मेल्याच्या तीन वर्षानंतर बाळाने घेतला जन्म

वृत्तसंस्था
रविवार, 19 ऑगस्ट 2018

बंगळूरमध्ये काम करत असलेल्या एका महिलेचा दुःखाचा दिवसच तिच्यासाठी आनंदाचा बनला आहे. ज्या दिवशी तिने आपल्या पतीला गमावले, त्याच दिवशी तब्बल तीन वर्षानंतर तिला आपल्या पतीचे बाळ मिळाले आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये तिच्या पतीच्या बाळाने जन्म घेतला आहे. उच्च वैद्यकिय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या महिलेच्या जीवनात आनंद परतला आहे.

मुंबई- बंगळूरमध्ये काम करत असलेल्या एका महिलेचा दुःखाचा दिवसच तिच्यासाठी आनंदाचा बनला आहे. ज्या दिवशी तिने आपल्या पतीला गमावले, त्याच दिवशी तब्बल तीन वर्षानंतर तिला आपल्या पतीचे बाळ मिळाले आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये तिच्या पतीच्या बाळाने जन्म घेतला आहे. उच्च वैद्यकिय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या महिलेच्या जीवनात आनंद परतला आहे.

2015 मध्ये सुप्रिया जैन आणि गौरव यांना लग्नाच्या पाच वर्षानंतरही कुठल्याही प्रकारचे अपत्य झाले नव्हते. त्यानंतर त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, दुर्दैवाने गौरवचा मोटार अपघातात मृत्यू झाला. यानंतर, सुप्रियाने एका ब्लॉगद्वारे आपल्या पतीच्या मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासंदर्भात त्या डॉक्टर फिरुजा यांना भेटल्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे खुप अवघड काम होते. परंतु, खुप मोठ्या कष्टाने सुप्रियाच्या पतीचे शुक्राणू डॉक्टरांनी जपून ठेवले होते. परंतु, त्या शुक्राणूंच्या प्रत्यारोपणाचा प्रयत्न सुप्रियावर सातत्याने असफल ठरत होता. 

डॉक्टरांच्या मोठ्या मेहनतीनंतर त्यांनी त्या शूक्राणूंचा प्रत्यारोपणाचा प्रयत्न दुसऱया महिलेवर करण्याचे ठरवले आणि तो प्रयोग यशस्वी झाला. नुकतेच, दुसऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. बाळाने जन्म घेतला त्यावेळी सुप्रिया बालीमध्ये होती, बाळाने जन्म घेतल्यावर तिच्या पतीसारखेच तिचे बाळ असेल अशी आशा तिने यावेळी व्यक्त केली आहे.

Web Title: 3 years after man died, his son is born