रेल्वेच्या 30 टक्के गाड्या गेल्या वर्षी लेट 

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

2016-17 मध्ये रेल्वेने 2687 ठिकाणांवर 15 लाख ब्लॉक घेतले, तर 2017-18 मध्ये हे प्रमाण 4426 ठिकाणे आणि 18 लाख ब्लॉक असे होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लोहमार्गांची दुरुस्ती आणि यंत्रणेच्या आधुनिकीकरणामुळे दुर्घटना मात्र कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

नवी दिल्ली : गाड्यांच्या वेळा पाळण्याच्या दृष्टीने रेल्वेला गेले वर्ष (2017-18) वाईट गेल्याचे अधिकृत आकडेवारीवरून दिसते. रेल्वेच्या तब्बल 30 टक्के गाड्या या काळात विलंबाने धावल्या. 

एप्रिल 2017 ते मार्च 2018 या काळात 71.39 टक्के मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्या वेळेवर धावल्या. हेच प्रमाण 2016-17 मध्ये 76.39 टक्के होते. 2015-16 मध्ये 77.44 टक्के गाड्या वेळेत धावल्या होत्या, असे ही आकडेवारी सांगते. रेल्वेने दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतल्यामुळे गाड्यांना विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

2016-17 मध्ये रेल्वेने 2687 ठिकाणांवर 15 लाख ब्लॉक घेतले, तर 2017-18 मध्ये हे प्रमाण 4426 ठिकाणे आणि 18 लाख ब्लॉक असे होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लोहमार्गांची दुरुस्ती आणि यंत्रणेच्या आधुनिकीकरणामुळे दुर्घटना मात्र कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. 

घटते अपघात 

135 
2014-15 मध्ये 

107 
2015-16 मध्ये 

104 
2016-17 मध्ये 

73 
2017-18 मध्ये 

Web Title: 30 percent of trains are delayed last year