30 वर्षे जुन्या चर्चच्या जागेवर होणार मंदिराची उभारणी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 डिसेंबर 2018

अमेरिकेतील एका 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी आता मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. व्हर्जिनियाच्या पोट्समाऊथमधील चर्चच्या जागेवर आता हिंदूमंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या चर्चला आता हिंदू मंदिराचं स्वरुप दिलं जाणार आहे.

व्हर्जिनिया- अमेरिकेतील एका 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी आता मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. व्हर्जिनियाच्या पोट्समाऊथमधील चर्चच्या जागेवर आता हिंदूमंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या चर्चला आता हिंदू मंदिराचं स्वरुप दिलं जाणार आहे.

स्वामीनारायण संस्थेकडून खरेदी करण्यात आलेलं हे अमेरिकेतील सहावं आणि जगातील नववं मंदिर असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलं आहे. लवकरच या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर उभारण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख पुरुषोत्तमप्रियदास स्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेतील 30 वर्षे जुन्या चर्चच्या जागी मंदिराची उभारणी केली जाणार असल्याची माहिती महंत भगवतप्रियदास स्वामींनी दिली आहे. व्हर्जिनियातील हे हरिभक्तांसाठीचं पहिलं मंदिर असेल. मंदिराची उभारणी करण्यासाठी फार बदल करण्याची गरज भासणार नाही असेही सांगण्यात आले आहे. कारण चर्चमध्ये आधीपासूनच अन्य धर्मांसाठी आध्यात्मिक जागा उपलब्ध होती, असं भगवतप्रियदास स्वामींनी सांगितलं.

Web Title: 30 year old church in america bought to get converted into swaminarayan hindu temple