काश्मीरमध्ये बस अपघातात 33 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

काश्मीरमध्ये हा अपघात झाला असून, केशवानहून ही बस किश्तवारकडे जात होती. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवार येथे आज (रविवार) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

काश्मीरमध्ये हा अपघात झाला असून, केशवानहून ही बस किश्तवारकडे जात होती. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मूचे पोलिस महासंचालक एम. के. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, आणखी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात येत  आहेत. आज सकाळी साडेसातच्या सुमारास सिर्गवारी येथे ही बस दरीत कोसळली. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 Killed As Mini Bus Falls Into Gorge In Jammu and Kashmirs Kishtwar